हवामान: खंडाचा अंतर्गत भाग हा सागरी किनाऱ्यापासून खूप दूर असल्याने या भागाचे उन्हाळा अति उष्ण तर हिवाळा अतिथड असतो, म्हणजेच तेथे हवामान अतिशय विषम असते.
मानवी साधनसंपत्ती: कोणत्याही देशातील नागरिक ही त्या देशाची सर्वात महत्त्वाची साधनसंपत्ती असते. यासाठी प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
मृदासंपत्ती: मृदासंपत्ती पृथ्वीवरील सर्व सजीवाचा मुख्य आधार आहे, कारण सर्व प्राणीमात्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अन्नासाठी ज्या वनस्पतीवर अवलंबून असतात त्या वनस्पतीचे अस्तित्त्व प्रामुख्याने मुदावर अवलंबून असते. आशिया खंडाच्या वेगवेगळ्या भागांत विविध प्रकारची मुदा आढळते. सिधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, तैग्रिस इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मुदा असल्याने शेतीचा विकास जास्त झालेला आढळतो. भारतीय द्विपकल्पाच्या पठारी भागात काळी मुदा आढळते. मध्यआशियाच्या उचं भागात पर्वतीय मुदा आढळते. वाळवंटी प्रदेशात रेताड, वाळूमीश्रित मुदेची प्रमाण आधिक असते.
आशिया
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!