ऐतिहासिक साधने म्हणून शिलालेख, द्वारलेख, ताम्रलेख, कोरीव लेख, यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आलेखशास्त्र (Graphology) असे म्हणतात. आलेखशास्त्रात ऐतिहासिक माहिती मिळविता येते.
आलेखशास्त्र या शास्त्रामध्ये व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून तिचा स्वभावधर्म समजू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या अनेक पत्रांचा संग्रह तपासला असता त्या व्यक्तीचा स्वभाव निश्चित समजू शकतो. उदा. एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर शब्दाच्या शेवटी जर वर वर जाणारे असेल तर ती व्यक्ती महत्त्वाकांक्षी असते असा निष्कर्ष निघतो. अर्थात् निष्कर्ष ढोबळ मानाने काढलेले असतात. म्हणून वापरलेला कागद, त्या व्यक्तीचे वय, त्याचे लिंग व मनोवृत्ती यांचा अभ्यास केला पाहिजे. काही वेळा हेतुपूर्वक दिशाभूल करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची अक्षरे काढली जातात. बऱ्याच वेळां अतिशय कामात व्यग्र असणाऱ्या माणसाचे हस्ताक्षर अतिशय खराब असते. उदा. पत्रकार व डॉक्टर. एकंदरीत या शास्त्राच्या अभ्यासावरून एवढे निश्चित समजू शकेल की तो मनुष्य सावधान चित्ताने लिहीत होता की घाईने लिहीत होता.
आलेखशास्त्र
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.