आलांब्रा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आलांब्रा

आलांब्रा (स्पॅनिश: Alhambra) हा स्पेन देशाच्या आंदालुसिया संघातील ग्रानादा शहरामधील एक ऐतिहासिक किल्ला व राजवाडा आहे. इ.स. ८८९ साली बांधला गेलेल्या ह्या किल्ल्याचे रूपांतर ग्रानादाचा सुलतान युसुफ पहिला ह्याने १३३३ साली एका राजवाड्यामध्ये केले.

स्पेनमधील मुस्लिम अधिपत्यादरम्यान आलांब्रामध्ये अनेक मुस्लिम वास्तू बांधल्या गेल्या. रिकॉंकिस्तानंतर पवित्र रोमन सम्राट पहिल्या कार्लोसने इ.स. १५२७ साली येथे आपला राजवाडा बांधला. मधील काळात दुर्लक्षित राहिल्यामुळे पडझड झाल्यानंतर १९व्या शतकामध्ये आलांब्राचा जीर्णोद्धार हाती घेण्यात आला. सध्या आलांब्रा हे स्पेनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. आलांब्रा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असून जगातील सात नवी आश्चर्ये स्पर्धेमध्ये ते एक उमेदवार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →