"आर्य: अ फिलॉसॉफिकल रिव्ह्यू" हे ६४ पानांचे इंग्रजी मासिक होते आणि ते १९१४ ते १९२१ दरम्यान भारतात प्रकाशित होत होते. मीरा अल्फासा, पॉल रिचर्ड आणि श्रीअरविंद त्याचे संस्थापक होते. पुढे पहिल्या महायुद्धामुळे मीरा अल्फासा, रिचर्डस यांना फ्रान्सला परत जावे लागले. त्यामुळे नंतर या मासिकाची संपूर्ण जबाबदारी श्रीअरविंद यांनी सांभाळली. मुळात हे मासिक काढण्याची संकल्पना पॉल रिचर्ड (मीरा अल्फासा यांचे पती) यांची होती. माझ्या कार्याची बौद्धिक बाजू असे यातील लेखनाचे वर्णन करता येईल, असे श्रीअरविंद यांनी म्हटले होते. वेदान्त तत्त्वज्ञान (वैदिक वेदान्त) जगासमोर नव्या परिभाषेत मांडणे हा याचा एक हेतू होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर्य मासिक
थोडक्यात पण महत्त्वाचे.