आर्मेनिया

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

आर्मेनिया

आर्मेनिया (अधिकृत नाव: आर्मेनियन: Հայաստանի Հանրապետություն) हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.

२९,८०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या देशाची लोकसंख्या ३० लाख आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून येथील साक्षरता ९९ टक्के आहे. येरेवान ही या देशाची राजधानी आहे.

भूतपूर्व सोव्हिएत संघापैकी एक घटक प्रजासत्ताक असलेला आर्मेनिया आता बहुपक्षीय लोकशाहीवादी प्रजासत्ताक आहे. आर्मेनियाला प्राचीन सांस्कृतिक व राजकीय वारसादेखील लाभला आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या सुरुवातीला (सर्वसाधारण मान्यतेनुसार इ.स. ३०१) आर्मेनियाचे राज्य हे या ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे या परिसरातील पहिले राज्य होते. आजही आर्मेनियातील बहुसंख्य जनता ख्रिश्चन धर्मीय असली तरीही आर्मेनियाचे प्रजासत्ताक घटनात्मकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष राज्य आहे. या देशाला १९९१ साली रशिया कडून स्वातंत्र्य मिळाले. हे एक डोंगराळ राष्ट्र असून येथील जमीन अतिशय सुपीक आहे. बटाटे, अाॅलिव्ह, द्राक्ष, कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →