आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती जी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट फॉरमॅटमध्ये आणि २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या तीन-लीग क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रणालीची सर्वोच्च पातळी होती. लीगमध्ये १३ संघ सहभागी झाले होते, त्यापैकी अव्वल ८ संघ थेट पुढील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतात आणि तळाचे ५ संघ विश्वचषक पात्रता फेरीत प्रवेश करतात. सुपर लीगने २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी थेट पात्रतेचा मार्ग म्हणून वनडे क्रमवारीची जागा घेतली. वनडे सुपर लीगची एकमेव आवृत्ती २०२०-२०२३ दरम्यान होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.