आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्स (रोमन अंक "एक्स(X)" उच्चारलेले "दहा") हे ॲपल इंक द्वारे डिझाइन केलेले, विकसित आणि मार्केटिंग केलेले स्मार्टफोन आहेत. आयफोनची ती बारावी पिढी आहे. ॲपलचे सीईओ टिम कूक यांनी ॲपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये कमी किंमतीच्या आयफोन एक्सआरसह त्यांची १२ सप्टेंबर २०१८ रोजी घोषणा केली. रिलीझ होताच एक्सएस आणि एक्सएस मॅक्सची अमेरिकेत किंमत. $९९९/$१०९९, यूकेमध्ये £ ९९९/£१०९९, युरोपमध्ये €११४९ /€१२४९, चीनमध्ये आरएमबी ८६९९ / आरएमबी ९५९९ आणि भारतात ₹९९९०० /₹१०९९००ची किंमत होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयफोन एक्सएस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.