आब्रुत्सो (इटालियन: Abruzzo) हा इटलीच्या मध्य भागातील एक प्रदेश आहे. आब्रुत्सोच्या पूर्वेस एड्रियाटिक समुद्र तर इतर दिशांना इटलीचे इतर प्रदेश आहेत. भौगोलिक दृष्ट्या आब्रुत्सो इटलीच्या मध्यात असला तरीही ऐतिहासिक काळात दोन सिसिलींच्या राजतंत्राचा भाग असल्यामुळे तो दक्षिण इटलीमध्ये गणला जातो. लाक्विला ही आब्रुत्सोची राजधानी तर पेस्कारा हे येथील सर्वात मोठे शहर आहे. आब्रुत्सोची पश्चिम सीमा रोमपासून केवळ ८० किमी अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आब्रुत्सो
या विषयातील रहस्ये उलगडा.