आना सेलिया दि आर्मास कासो (३० एप्रिल, १९८८ - ) एक क्यूबन आणि स्पॅनिश अभिनेत्री आहे. तिने क्युबात तिच्या कारकिर्दीची सुरुवात रोमँटिक नाटक उना रोसा डी फ्रान्सिया (२००६) मधील प्रमुख भूमिकेने केली. वयाच्या १८ व्या वर्षी, ती माद्रिद, स्पेन येथे गेली आणि २००७ ते २०१० या काळात तिने लोकप्रिय नाटक एल इंटरनाडोमध्ये काम केले.
लॉस एंजेलसला गेल्यानंतर, मनोवैज्ञानिक थ्रिलर नॉक नॉक (२०१५) आणि कॉमेडी-गुन्हेगारी चित्रपट वॉर डॉग्स (२०१६) मध्ये आर्मासच्या इंग्रजी-भाषिक भूमिका होत्या. नाइव्हज आउट (२०१९) या मिस्ट्री फिल्ममध्ये नर्स मार्टा कॅब्रेराच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर तिने नो टाइम टू डाय (२०२१) मध्ये बॉन्ड गर्ल पालोमा आणि बायोपिक ब्लोंड (२०२२) मध्ये नॉर्मा जीन (मॅरिलिन मनरोची) भूमिका साकारली. ब्लॉड चित्रपटासाठी, डी आर्मास ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली पहिली क्यूबन बनली.
आना दि आर्मास
या विषयातील रहस्ये उलगडा.