आनंदीबाई भट (माहेरच्या आनंदीबाई ओक) या रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशव्यांच्या पत्नी होत.
आनंदीबाई यांचे माहेर हे ओकांचे. हे ओक घराणे गुहागरजवळील मळण गावातील होय. हे गाव गुहागर पासून २० किमी अंतरावर आहे. मुळात सर्व ओक हे गुहागरजवळ असणाऱ्या पालशेत गावचे. पुढे एका कुटुंबाला पालशेत गावची देशमुखी मिळाली आणि सरंजाम म्हणून आठ गावे दिली गेली, त्यात मळण हे गाव होते. पालशेत येथून या आठ गावात ओकांची कुटुंबे गेली. राघो महादेव हे आनंदीबाई यांचे वडील. राघो महादेव हे कारकून, शिलेदार होते त्यामुळे बहुतांश वेळा ते घाटावर असत.
आनंदीबाई यांनी पुढे आपल्या दत्तक भावासाठी, बाबुराव याच्यासाठी, काही इनाम मिळवून दिले. ते इनाम अगदी इनाम कमिशनपर्यंत चालू होते. पुढे इंग्रजांच्या आमदानीत त्यांना पेन्शन मिळू लागले. बाबुराव ओक यांची मुले पुढे बरीच भांडकुदळ निघाली. यामुळे घराण्याचे फार नुकसान झाले. या या बापूंचा मोठा चिरंजीव माधवराव ओक हे सन १९१४ पर्यंत हयात होते. माधवरावांचा मुलगा विनायकराव हा पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला शिकवत असे. तो सन १९११ मध्ये वारला.त्यांना दोन मुले. पैकी विश्वनाथ विनायकराव हे मुंबईत वकील होते. बापूराव ओक यांची आई म्हणजे काकूबाई ओक अर्थात आनंदीबाई पेशवे यांची आई. त्यांना सालिना ५००० रुपये मिळत असत.
आनंदीबाई भट
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.