आद्य शंकराचार्य

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आद्य शंकराचार्य

आद्य शंकराचार्य किंवा आदि शंकराचार्य (मल्याळम: ആദി ശങ്കരൻ, संस्कृत: आदि शङ्करः ;) (इ.पू. ५०८ - इ.पू. ४७६) हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी सांख्यांचा प्रधानकारणवाद आणि पूर्वमिमांसिकांचा ज्ञानकर्मसमुच्चयवाद खोडून काढत अद्वैतवाद प्रस्थापित केला आणि ज्ञानमार्गाचा पुरस्‍कार केला. इ.पू. ५०० च्या आसपास कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, त्यांनी वैदिक धर्माची पुनःस्थापना केली.

शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका मठ, जगन्‍नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.

या आदि शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर (ब्रह्मसूत्र, उपनिषदे व भगवद्गीता) आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. त्यांच्या अनेक पद्यरचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →