आडिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव तेथील महाकाली मंदिराकरिता प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावाला प्राचीन इतिहास आहे. भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्पन्न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार वि.का राजवाडे यांनी लिहिले आहे.
असे म्हणतात की आडिवरेच्या या महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली, असे म्हणतात. हे महाकालीचे मंदिर अत्यंत सुंदर असून त्याच्या चांगल्या प्रकारे निगा राखलेली आहे. देवीची मूर्ती सुबक असून तिच्या मागे दोन सुंदर मोर आहेत. महाकाली मंदिराच्या ठिकाणी राहण्यासाठी भाड्याने खोल्या मिळू शकतात, तसेच पूर्वसूचना दिल्यास जेवणाची सोय होते.
आडिवरे येथे जाण्यासाठी रत्नागिरीहून एस्टीच्या बसेस आहेत. तरी आडिवर्या जवळ राहण्याची सुबक व्यवस्था जवळील मोगरे गावात होउ शकते.
आडिवरे (राजापूर)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.