आघूर्ण, अर्थात मोटन (इंग्लिश: Torque , टॉर्क ;) म्हणजे एखाद्या वस्तूला अक्षाभोवती किंवा बिजागरीभोवती फिरवणारी बलाची प्रवृत्ती होय. नुसते बल एखाद्या वस्तूस ढकलते किंवा ओढते; तर आघूर्ण वस्तूला पिळते.
गणितीय सूत्रानुसार बल आणि परिबलभुजा, म्हणजे वस्तूच्या अक्षापासून(किंवा बिजागिरीपासून) बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे अंतर, यांचा सदिश गुणाकार म्हणजे आघूर्ण होय. सदिश गुणाकारामुळे अर्थातच येणाऱ्या आघूर्णाची राशी सदिश असते.
τ
=
r
×
F
{\displaystyle {\boldsymbol {\tau }}=\mathbf {r} \times \mathbf {F} \,\!}
τ
=
r
F
sin
θ
{\displaystyle {\boldsymbol {\tau }}=rF\sin \theta \,\!}
यांमध्ये
τ (टो)हे सदिश आघूर्ण असून तोच टो(τ) आघूर्णाचे परिमाण(माप) आहे,
r (आर) हे सदिश अंतर आहे (आघूर्ण मापण्याच्या बिंदूपासून बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे सदिश अंतर), आणि r हे त्या अंतराचे परिमाण(मोजमाप) आहे,
F (एफ) हे सदिश बल असून, तोच F त्या बलाचे परिमाण(मोजमाप) आहे,
× सदिश गुणाकाराचे चिन्ह आहे,
θ (थीटा)हा बल सदिश व अंतर सदिश यांमधील कोन आहे.
आघूर्ण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?