असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०२५ असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरू झालेल्या मालिकांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या असोसिएट सदस्यांदरम्यान खेळल्या गेलेल्या सर्व अधिकृत २० षटकांच्या सामन्यांना पूर्ण पुरुष ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय किंवा महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा मिळण्याची पात्रता होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या सर्व सदस्यांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्यांना १ जुलै २०१८ पासून महिला संघांसाठी आणि १ जानेवारी २०१९ पासून पुरुष संघांसाठी टी२०आ दर्जा प्रदान केला होता. या हंगामात प्रामुख्याने आयसीसीच्या असोसिएट सदस्यांचा सहभाग असलेल्या सर्व टी२०आ क्रिकेट मालिकांचा समावेश होता. या मालिका २०२५ मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट या लेखात समाविष्ट असलेल्या मालिकांव्यतिरिक्त खेळल्या गेल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →