असीमा चॅटर्जी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

असीमा चॅटर्जी

असीमा चॅटर्जी (२३ सप्टेंबर, इ.स. १९१७ – २२ नोव्हेंबर, इ.स. २००६) या भारतीय रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे वडील डॉक्टर होते. कोलकाता विद्यापीठातून असीमा चॅटर्जी यांनी इ.स. १९३८ साली सेंद्रीय रसायनशास्त्रात (ऑर्गनिक केमिस्ट्री) एम.एस्सी. पदवी घेतली. इ.स. १९४४ साली डॉ. पी.के. बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्या डी.एस्सी. झाल्या. भारतात कुठल्याही विद्यापीठात डॉक्टर ऑफ सायन्स होणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत.

असीमा चॅटर्जी यांनी रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे या विषयांवर चारशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील बरेचसे लेखन पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत केले गेले आहेत. यांचे मुख्य कार्यक्षेत्र कोलकाता हेच राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →