अष्टमी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते. सूर्यापासूनचे चंद्रापर्यंतचे कोनांतर (पृथ्वी-सूर्य सरळ रेषेने पृथ्वी-चंद्र रेषेशी पृथ्वीजवळ केलेल्या कोनाचे मोजमाप) जेव्हा ८५ ते ९६ अंश असते तेव्हा शुक्ल पक्षातली अष्टमी (First Quarter Phase), आणि जेव्हा ते २६५ ते २७६ अंश असते तेव्हा वद्य पक्षातली अष्टमी (Third Quarter Phase) असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →