अशोक पत्की (जन्म : ऑगस्ट २५, १९४१) हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. ते "मिले सुर मेरा तुम्हारा", "पूरब से सूर्य उगा" यांसारख्या त्यांच्या अत्यंत लोकप्रिय रचनांसाठी ओळखले जातात. पत्की यांनी आठ हजार पेक्षा जास्त जिंगल्स (जाहिरातींचे संगीत), चारशे नाटकांचे संगीत, सव्वाशे चित्रपटांना संगीत, ५०० मालिकांची शीर्षकगीते तयार केले आहेत. आणि २००६ मध्ये ५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'अंतरनाद' या कोकणी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ या हिंदी चित्रपटांची गाणी त्यांनी केली. पण, ती त्यांच्या नावावर नाहीत.
पत्की मुंबईतल्या कांदेवाडीत रहात, सध्या त्यांचे निवासस्थान माहीम येथे आहे. त्यांच्या धाकट्या भगिनी मीना पत्की याही गायिका आहेत. ‘नाविका रे वारा वाहे रे’ हे सुमन कल्याणपूर यांनी गायलेले गाणे हे अशोक पत्की यांनी अगदी पहिल्यांदा संगीतबद्ध केलेले गाणे होय.
अशोक पत्की
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?