डॉ. अशोक प्रभाकर कामत (जन्म: १० जानेवारी. इ.स. १९४२, मृत्यू : २६ जानेवारी २०२५ ) हे एक हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्मयाचे चिकित्सक अभ्यासक आहेत. आयुष्यात भेटलेल्या मोठ्या लोकांच्या सहवासामुळे त्यांना ग्रंथसंग्रह, वाचन व लेखन या चांगल्या सवयी जडल्या, असे ते सांगतात. त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह १२ हजार पुस्तकांचा असून तो सर्वांसाठी खुला आहे.
प्रा. अशोक कामत ह्यांनी शाहू महाविद्यालयात व गरवारे कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले. त्यांच्या प्रयत्नाने पुणे विद्यापीठात नामदेव अध्यासन उभे झाले . (ते सध्या २०१७ साली बंद पडले आहे!)
त्यांनी स्थापन केलेल्या 'गुरुकुल प्रतिष्ठान न्यास’ या संस्थेने संत साहित्याचे ३५०हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. ही संस्था विद्यार्थ्यांचे संशोधन प्रसिद्ध करते.
अशोक कामत
थोडक्यात पण महत्त्वाचे.