अशोक कामटे (फेब्रुवारी २३, इ.स. १९६५ - नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे मुंबईचे अॅडिशनल पोलिस कमिशनर होते. त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी झाला.त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे झाले. पुढे ५ वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सन मधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते १९८२ मध्ये उत्तीर्ण झाले.
त्यांनी १९८५मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली .त्यांनी त्यांचे पद्विउत्तर शिक्षण सेंट स्तीफंस महाविद्यालयातून १९८७ साली पूर्ण केले.त्यांनी भारताचे पेरू मध्ये झालेल्या junior power lifting championship मध्ये प्रतिनिधित्व केले. अशोक कामते यांना पत्नी विनिता पासून दोन मुले राहुल व अर्जुन झाली. त्यांचे वडील एम.आर. कामटे भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी होते.
अशोक कामटे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?