अवसायक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अवसायक किंवा परिसमापक (इंग्लिश:लिक्विडेटर) म्हणजे अशी व्यक्ती जी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १०२ अंतर्गत, संस्थेच्या निबंधकाकडून एखाद्या सहकारी संस्थेचे कामकाज बंद करण्यासाठी किंवा तिचे विसर्जन करण्यासाठी नियुक्त केली जाते. ही एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय आणि कायदेशीर भूमिका आहे. जेव्हा एखादी सहकारी संस्था (उदा. पतसंस्था, गृहनिर्माण संस्था) आर्थिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे बंद (अवसायनात) पडते, तेव्हा त्या संस्थेचा कारभार आटोपते घेण्यासाठी आणि तिची मालमत्ता विकून देणी भागवण्यासाठी निबंधकांकडून अवसायक नियुक्त केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →