अल्लू अर्जुन (तेलुगू: అల్లు అర్జున్; ८ एप्रिल १९८२) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे जो प्रामुख्याने तेलगू चित्रपटांत काम करतो. विजेता चित्रपटात बाल कलाकार म्हणून आणि डॅडीत नर्तक म्हणून काम केल्यावर अर्जुनने गंगोत्री चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
त्यानंतर अर्जुन सुकुमारच्या आर्या चित्रपटात दिसला.आर्या मधील त्याची भूमिका ही त्याच्या यशाची पायरी होती, त्याने त्याला फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट तेलगू अभिनेता पुरस्काराने नामांकन मिळवून दिला आणि नंदी पुरस्कार सोहळ्यात त्याला विशेष ज्युरी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेता जूरीसाठी दोन सिनेमा (CineMAA) पुरस्कार मिळाले आणि ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले.
त्यानंतर त्याने व्ही. व्ही. विनायकच्या बनीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी बन्नीची भूमिका साकारली. समीक्षकांनी त्याच्या पद्धती आणि नृत्याचे कौतुक केले. त्याचा पुढचा चित्रपट ए. करुणाकरनची संगीतमय प्रेमकथा हॅपी होता. त्यानंतर त्यांनी पुरी जगन्नाथच्या देसमदुरु' या ऍक्शन फिल्ममध्ये काम केले, ज्यात त्यांनी बाला गोविंदम या निर्भय पत्रकाराची भूमिका केली होती.
अर्जुनने पाच दाक्षिणात्य फिल्मफेर अवॉर्ड्स व दोन नंदी पुरस्कार जिंकले आहेत.
अल्लू अर्जुन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.