अल्तेपेत्ल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अल्तेपेत्ल हे कोलंबस-पूर्व आणि स्पॅनिश विजय-काळातील अ‍ॅझ्टेक समाजातील स्थानिक, वांशिक-जमाती वर आधारलेली राजकीय संस्था होती. ह्याची तुलना आपल्याकडील नगरराज्यांची करता येईल, परंतु व्याख्या आणि व्यवस्थेनुसार दोन्ही भिन्न ठरतात. हा शब्द अ-त्ल (ā-tl) - जल - आणि तेपे-त्ल (tepē-tl) - डोंगर ह्या दोन नाहुआतल शब्दांपासून तयार झाला आहे.

नाहुआतल विद्वान लिसा सौसा, स्टॅफॉर्ड पूल आणि जेम्स लॉकहार्ट नी म्हणले आहे:



नाहुआ व्याकरण पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील किंवा एखाद्या जागेतील लोकांची संपूर्णतेची कल्पना अल्तेपेतल ह्या एककांच्या संग्रहातून करणे आणि त्या संज्ञेमध्ये बोलणे होय





ते तज्ञ इंग्लिश भाषेतील अंदाजे-तौलनिक शब्द वापरण्याऐवजी नाहुआतल संज्ञा वापरणे अधिक पसंत करतात. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, व्हर्जिन ऑफ ग्वादालुपेच्या संबंधित बऱ्याच कागदपत्रांतून स्पॅनिश शब्द चिवादाद दे मेहिको (मेक्सिको सिटी) च्या भाषांतरात अल्तेपेतल हा शब्द वारंवार वापरला जातो आणि हे भाषांतरित मजकूर रंगीत असून ते नाहुआ समाजव्यवस्थेबद्दल माहिती सांगते.

ह्या कल्पनांची तुलना मायांच्या काह आणि मिक्स्तेकांच्या नू ची करता येईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →