अरेसीबो वेधशाळा ही अटलांटिक महासागरातील पोर्तो रिको देशामध्ये अरेकिबो शहराच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर असलेली एक वेधशाळा आहे. अरेसीबो वेधशाळेचे प्रमुख साधन रेडियो दुर्बीण हे आहे. अमेरिकेचे संरक्षण खाते आणि कॉर्नेल विद्यापीठाच्या संयुक्त प्रकल्पान्वये ही वेधशाळा १ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी बांधून पूर्ण झाली. हिच्या उभारणीसाठी ८३ लक्ष डॉलर्स खर्च आला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरेसीबो वेधशाळा
थोडक्यात पण महत्त्वाचे.