अरुणिमा सिन्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अरुणिमा सिन्हा

अरुणिमा सिन्हा(जन्म २० जुलै १९८८) ही जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी जगातील पहिली (अपघातामुळे)अपंग झालेली महिला आहे. ती भारतीय आहे. उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ रोजी लखनौ येथून दिल्लीला जात असताना काही गुंडांनी तिला पद्मावती एक्स्प्रेसमधून बाहेर फेकले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरुणिमाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला. एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला असलेल्या बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →