अमेरिकेची संयुक्त संस्थाने देश एकूण ५० राज्यांमध्ये विभागला गेला आहे. ह्या राज्यांची शासने स्वायत्त असून केंद्रीय सरकारने त्यांना संपूर्ण सार्वभौमत्व दिलेले आहे.कारण अमेरिकेत अधिवास कायद्यानुसार तेथील नागरिक हा तो राहत असलेल्या राज्याचा तसेच अमेरिकन संघराज्याचा या दोन्हींचा एक भाग आहे.अमेरिकेत अमेरिकन नागरिकत्व आणि निवासी दाखला या संबंधीचे कायदे लवचिक असून त्यात कोणत्याही एकाच सरकारची(राज्य सरकार किंवा संघराज्य सरकार) संमती घेणे अनिवार्य नाही. (अपवाद : कोणी व्यक्ती न्यायालयीन चौकशींशी संबंधित असेल तर त्याला संमती घ्यावीच लागते. उदा. पेरोलवर असलेले व्यक्ती अथवा काडीमोडीतून सुटलेल्या दाम्पत्याचे अपत्य ज्याचा अजून निकाल लागलेला नाही.)
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमेरिकेची राज्ये
यामागील विज्ञान आणि इतिहास.