अमीन सयानी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अमीन सयानी

अमीन सयानी हे भारतातील लोकप्रिय माजी रेडिओजॉकी आणि रेडिओ उद्घोषक होते. रेडिओ सिलोन वर त्या त्या आठवड्यात प्रसिद्धी मिळवणाऱ्या चित्रपट गीतांची मालिका बिनाका गीतमाला कार्यक्रम सादर करत असत. या कार्यक्रमात ने त्यांना संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.

आजही ते सर्वात जास्त अनुकरण केल्या जाणाऱ्या उद्घोषकांपैकी एक आहेत. पारंपारिक "भाइयों और बहनो" च्या विरुद्ध "बेहनो और भाइयों" (म्हणजे "बहिणी आणि भावांनो") ने जमावाला संबोधित करण्याची त्यांची शैली त्याकाळात मोठी प्रसिद्धीस आली होती. त्यांनी १९५१ पासून ५४,००० हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि १९,००० स्पॉट्स/जिंगल्सची निर्मिती केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →