ही एक एक भारतातील आदिवासी जमात आहे.. अरुणाचल राज्यातील सियांग भागात, ब्रह्मपुत्रेच्या उपनद्यांच्या दरम्यान असलेल्या दिहांग व सुबनसिरी या प्रदेशातील अबोर टेकड्यांचा सु. २०,७२० चौ. किमी. प्रदेश या जमातीने व्यापिला आहे. 'अबोर' म्हणजे 'जंगली' हे नाव त्यांना आसामी लोकांनी दिले, म्हणून अलीकडे ते स्वतःस 'आदि' म्हणवितात. हा बदल प्रशासनाने मान्य केला आहे. आदींच्या १५ समूहांपैकी गलोंग, पदम, मिन्योंग व शिमोंग हे मोठे समूह आहेत. अबोर ठेंगणे व मजबूत बांध्याचे लोक आहेत. ते वांशिक दृष्ट्या मंगोलियन वंशाचे असल्याने त्यांच्या शरीरावर व चेहऱ्यावर केसांचे प्रमाण फारच कमी असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अबोर जमात
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?