अप्पर आसाम विभाग किंवा उजनीदेश हा आसाम राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे, ज्यामध्ये ब्रह्मपुत्रा खोऱ्याच्या वरच्या भागात असलेले अविभाजित लखीमपूर आणि सिबसागर जिल्हे समाविष्ट आहेत. हा विभाग आयुक्तांच्या अधिकारक्षेत्रात येतो.
अप्पर आसाम विभागात ९ जिल्हे आहेत:
सिबसागर जिल्हा
जोरहाट जिल्हा
दिब्रुगढ जिल्हा
धेमाजी जिल्हा
गोलाघाट जिल्हा
चराईदेव जिल्हा
लखीमपूर जिल्हा
माजुली जिल्हा
तिनसुकिया जिल्हा
ह्यात चराईदेव आणि माजुली हे २०१६ मध्ये जिल्ह्याचा दर्जा मिळालेले सर्वात नवीन जिल्हे आहेत. गोलाघाट आणि तिनसुकिया हे क्षेत्रफळानुसार या प्रदेशातील सर्वात मोठे जिल्हे आहेत, ज्यांना अनुक्रमे १९८७ आणि १९८९ मध्ये जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.
अप्पर आसाम विभाग
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.