अपस्मार हा एक मेंदूशी संबंधित रोग आहे. ही व्याधी कोणत्याही वयोगटातील व्यक्तिंना होऊ शकते. ही व्याधी अनेक कारणांनी होऊ शकते, विशेषतः जन्माच्या वेळेस डोक्यास झालेल्या जखमा, पट्ट्कृमी(टेपवर्म) तसेच कमी शिजविलेल्या भाज्या वा मांस खाल्ल्यामुळे असे होऊ शकते. भावनिक उद्रेकामुळेही अपस्माराचे झटके येतात. त्याला मनःकायिक अपस्मार असे म्हणतात.
वारंवार आकडी येणे, फेपरे येणे तसेच काही वेळेस बेशुद्ध होणे ही काही प्रमुख लक्षणे असणाऱ्या दीर्घकालीन आजाराला ‘अपस्मार’ म्हणतात. हा एक चेतासंस्थेतील बिघाड असल्याचे मानले जाते.जगातील एकूण लोकसंख्येपैकी ०.३% ते ०.५% व्यक्ती अपस्माराने ग्रस्त आहेत.
अपस्मार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.