अनुदिनी किंवा जालपत्रिका किंवा जालनिशी किंवा ब्लॉग हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा आंतरजाल आणि नोंद या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व चित्रफिती वगैरे गोष्टी इंटरनेटच्या आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते. एकप्रकारे जालपत्रिका म्हणजे वैयक्तिक/सामूहिक/सांस्थिक स्वरूपातील मते/विषय/बातम्या वा इतर कोणत्याही विषयावरील जालपान (WebPage) होय. तिच्यावरील नोंदी बहुतेकवेळा उलट्या कालक्रमानुसार टाकलेल्या असतात. जालपत्रिकेच्या संपादकास अनुदिनी लेखक किंवा जालपत्रले़खक (इंग्रजीत bloggers) म्हणतात.
काही अनुदिन्यांवर लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात. जे अनुदिनीचे सभासद होतात ते तिथे स्वतःचे विचार मांडू शकतात आणि संदेशही पाठवू शकतात. हे सगळे "विजेट्स" द्वारे शक्य होते. ही बाब एखाद्या अनुदिनीला बाकीच्या सुप्त संकेतस्थळांपासून उजवे ठरवते. बऱ्याच अनुदिन्या बातम्यांसाठी अथवा समाजोपयोगासाठी बनवलेल्या असतात; तर बाकीच्या वैयक्तिक डायरीप्रमाणे काम करतात. सर्वसाधारण ब्लॉगांवर दुसऱ्या ब्लॉग्जवर जाण्यासाठी सोय असते. त्यासाठी आवश्यक तेथे लिखाण व चित्रे उपलब्ध करून दिलेली असतात. त्यामुळे आपल्याला त्या विषयाशी निगडित वेबपेजपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोहोचता येते. वाचकांना आपले विचार आणि टिप्पणी देण्यासाठी केलेली सोय ब्लॉग्जना विशेष महत्त्व मिळवून देतात. अनेक ब्लॉग्ज हे जरी सामान्यतः लिखाणासाठी बनवलेले असले, तरीही बऱ्याच ब्लॉग्जचा केंद्रबिंदू हा कला, चित्र, चित्रफिती, संगीत आणि आवाज असतो. मायक्रोब्लॉगिंग हे अजून एका प्रकारचा ब्लॉग आहे. यावर विचार संक्षिप्तपणे मांडता येतात.
टेक्नोरती नावाचे ब्लॉग सर्च इंजिन डिसेंबर २००७ पर्यंत ११२ दशलक्ष ब्लॉग्जवर नजर ठेवून होते.
अनुदिनी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.