अनिल गांगुली (२६ जानेवारी १९३३ – १५ जानेवारी २०१६) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक होते, ज्यांनी १९७० ते २००१ पर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. ते जया भादुरी अभिनीत कोरा कागझ (१९७४) आणि राखी अभिनीत तपस्या (१९७५) या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, आणि या दोन्ही चित्रपटांना सर्वोत्तम मनोरंजन प्रदान करणाऱ्या लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तृष्णा (१९७८), आंचल (१९८०), साहेब (१९८५) सारख्या राखी सोबतच्या चित्रपटांसाठी देखील ते ओळखले जातात.
त्यांची मुलगी, रुपाली गांगुली ही टेलिव्हिजन, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहे. त्यांचा मुलगा विजय गांगुली हा दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक आहे.
अनिल गांगुली
या विषयावर तज्ञ बना.