अनिता गुहा (१७ जानेवारी १९३९ - २० जून २००७) एक भारतीय अभिनेत्री होत्या ज्यानी सहसा चित्रपटांमध्ये पौराणिक पात्रे साकारली होती. १९७५ च्या जय संतोषी माँ चित्रपटामध्ये संतोषी माताची मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्या ओळखल्या गेल्या. यापूर्वी त्यांनी इतर पौराणिक चित्रपटांमध्ये सीतेची भूमिका केली होती; संपूर्ण रामायण (१९६१), श्री राम भरत मिलाप (१९६५) आणि तुलसी विवाह (१९७१). याशिवाय त्यांनी गुंज उठी शहनाई (१९५९), पूर्णिमा (१९६५), प्यार की राहें (१९५९), गेटवे ऑफ इंडिया (१९५७), देख कबीरा रोया (१९५७), लुकोचुरी (१९५८) आणि संजोग (१९६१) यांसारख्या पौराणिक कथांवर आधारीत नसलेल्या चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनिता गुहा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.