डिंपल चुन्नीभाई कापडिया (जन्म ८ जून १९५७) एक भारतीय चित्रपटअभिनेत्री आहे. वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या " बॉबी (१९७३) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी तिचा राजेश खन्ना यांच्याशी विवाह झाला आणि डिंपलने अभिनयापासून फारकत घेतली. १९८४ मध्ये राजेश खन्नापासून विभक्त झाल्यावर ती पुन्हा अभिनयाकडे वळली. नंतर आलेल्या "सागर" (१९८५) चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
मादक सौंदर्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली. ती कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली. "काश" (१९८७), "द्रिष्टी" (१९९०), "लेकिन..." (१९९०) आणि "रुदाली" (१९९३) या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. रुदालीसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९३ मध्ये आलेल्या गर्दिश मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि "क्रांतीवीर" (१९९४) मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
डिंपलने १९९० आणि २००० च्या दशकांत अधूनमधून काही चित्रपटांमधून अभिनय केला. "दिल चाहता है" (२००१) आणि अमेरिकन निर्मिती असणाऱ्या लीला (२००२) चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेंमध्ये दिसली. त्यानंतर "हम कौन है" (२००४),"प्यार मे ट्विस्ट (२००५), "फिर कभी" (२००८), "तुम मिलो तो सही" (२०१०), "बिईॅंग सायरस" (२००५),"लक बाय चान्स" (२००९),"दबंग" (२०१०), "पटियाला हाऊस" (२०११) आणि "कॉकटेल" (२०१२) मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली.
डिंपल कापडिया
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.