अनंत आत्माराम काणेकर (जन्म : २ डिसेंबर, इ.स. १९०५; - - ४ मे इ.स. १९८०), हे मराठी कवी, लेखक, व पत्रकार होते. १९३५ ते १९३९ अशी चार वर्षे ते आधी 'चित्रा’ आणि नंतर `आशा’ या साप्ताहिकांचे संपादक होते.
अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७मध्ये बी.ए. झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल.एल.बी.ची पदवी संपादन केली व वकिलीचा व्यवसाय केला. १९३३ मध्ये चांदरात या पहिल्या काव्यसंग्रहाचे आणि पुढील वर्षी पिकली पाने या लघुनिबंध संग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांनी १९३५ साली वकिली पैशाला रामराम ठोकला आणि साहित्य सेवेत स्वतःला वाहून घेतले.
इ.स. १९४१मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा महाविद्यालयात प्राध्यापक झाले. आणि तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ महाविद्यालयात आले. तेथूनच ते निवृत्त झाले.
`प्रभात’च्या `माणूस’ चित्रपटाचे ते संवादलेखक होते. तसेच नाट्यमन्वंतर या नाट्य संस्थेचे संस्थापक सदस्य होते.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 'अनन्वय' या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले.
अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.
महाराष्ट्र सरकार ललित लेख असलेल्या एखाद्या पुस्तकाला अनंत काणेकर यांच्या नावाचा पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेले लेखक :-
१. विनायकदादा पाटील यांना ‘गेले लिहायचे राहून’ या ललितलेखांच्या पुस्तकाला (१९९५)
२. गो.पु. देशपांडे (१९९६).
३. नागोराव घनश्याम देशपांडे (१९८७), वगैरे.
अनंत काणेकर
या विषयातील रहस्ये उलगडा.