अनंग देसाई (जन्म: ४ मे १९५३) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे. देसाई यांनी १०० हून अधिक टेलिव्हिजन शो आणि ७० चित्रपटांमध्ये काम केले आहे. खिचडी या टेलिव्हिजन मालिकेतील बाबूजींच्या भूमिकेसाठी ते ओळखले जातात. तो नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा माजी विद्यार्थी आहे, आणि संस्थेच्या व्यावसायिक संग्रहाचा एक भाग होता. टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रात कारकिर्द सुरू करण्यापूर्वी त्याने मोठ्या प्रमाणात हिंदी रंगभूमीवर काम केले.
देसाई यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९८२ मध्ये गांधी या चित्रपटातून केली, ज्यामध्ये त्यांनी भारतीय राजकारणी आचार्य कृपलानी यांची भूमिका साकारली होती.
अनंग देसाई
या विषयातील रहस्ये उलगडा.