अणुऊर्जा प्रकल्प हे एक औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे ज्यामध्ये उष्णतेचा स्रोत अणुभट्टी आसते. औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पच्या वैशिष्ट्याप्रमाणे, वाफ निर्माण करण्यासाठी उष्णता वापरली जाते जी वीज निर्माण करणाऱ्या जनरेटरशी (जनित्र) जोडलेले स्टीम टर्बाइन चालवते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थाने सप्टेंबर २०२३ मध्ये माहिती दिली की जगभरातील ३१ देशांत ४१० अणुऊर्जा अणुभट्ट्या कार्यरत आहेत आणि ५७ अणुऊर्जा अणुभट्ट्या निर्माणाधीन आहेत.
अणुऊर्जा प्रकल्प बहुतेक वेळा बेस लोडसाठी वापरल्या जातात कारण त्यांचे ऑपरेशन, देखभाल आणि इंधन खर्च कमी असतात. तथापि, अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी अनेकदा पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो, ज्यामुळे सुरुवातीच्या गुंतवणुकीला वित्तपुरवठा कसा केला जातो त्यानुसार महत्त्वपूर्ण आर्थिक खर्च होऊ शकतो.
अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये कार्बन फूटप्रिंट कमी आहे आहे ज्याची तुलना अपारंपरिक ऊर्जास्रोतशी करता येते जसे की सौर प्रकल्प आणि पवन ऊर्जा प्रकल्प. नैसर्गिक वायू आणि कोळसा यांसारख्या जीवाष्म इंधनांपेक्षा कार्बन फूटप्रिंट हे खूपच कमी आहे. काही आपत्तीजनक घटणा असूनही, अणुऊर्जा प्रकल्प हे वीज निर्मितीच्या सर्वात सुरक्षित पद्धतींपैकी एक आहेत.
अणुऊर्जा प्रकल्प
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?