अडियन जमात

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ही भारताच्या केरळ व कर्नाटक राज्यांत रहात असलेली एक जमात आहे. उच्च जातींना विटाळ होऊ नये म्हणून त्यांनी सहा पावले (अदि) दूर रहावे, असा प्राचीन काळात नियम होता. त्यावरून अडियन हे नाव प्रचलित झाले असावे, असा तर्क केला जातो. अडियन जमातीची लोकसंख्या सुमारे ५,६७१ (सन १९६१) होती. शिवद्विज ब्राह्मण व अस्पृश्य मुलगी यांच्या प्रतिलोम संबंधातून अडियनांची उत्पत्ती झाली, असेही म्हणतात. एका ब्राह्मणाने महादेवास अर्पण केलेला नैवेद्य भक्षण करण्याचा अनाचार केला, त्यामुळे त्याच्या वंशजांना निकृष्ट दर्जा प्राप्त झाला, तेच हे अडियन असाही समज आहे. भद्रकालीच्या देवळात अडियनांचे पूर्वज पुजारी होते, असा त्यांचा दावा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →