मराठी विकिपीडियावर अजिंठा आणि वेरुळ लेणीचे स्वतंत्र लेख असणे अभिप्रेत आहे तसे दुवे वर दिले आहेत. अजिंठा-वेरुळची लेणी हा एकत्र लेख त्या दोन लेखांवर बेतलेला असणे अभिप्रेत आहे. हा लेख पूर्वी मासिक सदर होऊन गेला आहे, तेव्हा लेखाचे संपादन खुले असले तरी या लेखाचे स्थानांतरण कनफ्यूजन्स टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत केले गेले आहे.
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही सातवाहन,वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्माण झाली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.
प्रामुख्याने बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण औरंगाबादपासून १०० कि.मी. ते ११० कि. मी. वर आहे.व जळगाव पासून फक्त 60 km अंतरावर आहे. सुमारे एक हजार वर्षेपर्यंत या ठिकाणी बौद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र होते असे मानले जाते.
वेरूळ हे भारतातील, पूर्वीच्या निजामाच्या हैदराबाद संस्थानातील व आताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातले गाव पाषाणातील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. इ.स. १९८३ साली वेरूळ लेणी 'युनेस्को जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली गेली.
अजिंठा-वेरुळची लेणी
थोडक्यात पण महत्त्वाचे.