अजातशत्रु

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अजातशत्रू (इ.स.पू. ४९३ - इ.स.पू. ४६०) हा मगध वंशीय सम्राट, बिंबिसार यांचा पुत्र होता. हा भगवान महावीर आणि गौतम बुद्धांच्या समकालीन राजा होता. ह्याच्या राजवटीची इ.स.पू. ५५४ - ५२७ किंवा इ.स.पू. ४९३-४६२ अशी कालमर्यादा सांगतात. त्याने जोरदारपणे वडिलांकडून मगधचे राज्य ताब्यात घेतले आणि त्याला तुरूंगात टाकले. त्याने लिच्छविंनी राज्य केलेल्या वज्जीविरूद्ध युद्ध केले आणि वैशाली प्रजासत्ताक जिंकला. बुद्धाच्या महापरिनर्वाणानंतर प्रथम बुद्ध परिषद आयोजन राजगृह येथे करण्यात आले होते या परिषदेसाठी राजा अजातशत्रू यांनी राजश्रय प्रदान केला होता

बौद्ध साहित्यात आणि जैन साहित्यात कूणिक, कूणिय अशा नावांनीही अजातशत्रूचा उल्लेख आढळतो.बिंबीसारला हर्यक वंशाचा संस्थापक समजले जाते. इ.पू. 6 व्या शतकामध्ये भारतात 16 महाजनपदांचा उदय झाला.. त्यात सर्वात शक्तीशाली महाजनपद मगध होते. बिंबिसार हा मगध घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होय.

बिंबीसार गौतम बुद्धांचा व महावीर यांचा समकालीन होता.

तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता व त्याने आपला राजवैद्य जीवक

यास गौतम बुद्धाच्या शुश्रूषेसाठी पाठविले.

त्याने राजगृह ही मगध राज्याची नवी राजधानी स्थापन केली.

बिंबीसारने मगध साम्राज्याचा पाया घातला. महापद्म याने गिरीव्रज हा राजधानी किल्ला बांधून मगधची पहिली

राजधानी स्थापन केली. बिंबीसारने बौद्ध धर्म स्वीकारला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →