अजनबी हा २००१ मधील अब्बास-मस्तान दिग्दर्शित आणि विजय गलानी निर्मित भारतीय हिंदी -भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि बिपाशा बसू यांचे अभिनय आहे व जॉनी लीवर, दलीप ताहिल, नरेंद्र बेदी आणि शरत सक्सेना यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. हा चित्रपट १९९२ च्या अमेरिकन थ्रिलर कन्सेंटिंग ॲडल्ट्सचे अनधिकृत रूपांतर आहे. संगीत अनू मलिक यांनी दिले आहे.
हा चित्रपट २१ सप्टेंबर २००१ रोजी प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून कुमार आणि बसू यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. १७ कोटींच्या बजेटच्या तुलनेत चित्रपटाने ₹३१ कोटींची कमाई करत हा बॉक्स ऑफिसवर मध्यम यश मिळवले. कुमारला नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला तर बसूला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने जगभरात ३१.८३ कोटींची कमाई केली.
अजनबी (२००१ चित्रपट)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.