अग्नि साक्षी (१९९६ चित्रपट)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अग्नि साक्षी हा १९९६ चा भारतीय हिंदी भाषेतील थरार नाट्य चित्रपट आहे जो पार्थो घोष दिग्दर्शित आहे, रणबीर पुष्प आणि हृदय लानी यांनी लिहिलेला आहे. ह्यात जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर आणि मनीषा कोइराला यांनी भूमिका केल्या आहेत व संगीत नदीम-श्रवण यांचे आहे. पाटेकर आणि कोइराला यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आणि पाटेकर यांना १९९७ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

माधुरी दीक्षित अभिनीत याराना (१९९५) आणि जूही चावला अभिनीत दरार (१९९६) यांच्या पाठोपाठ हा चित्रपट प्रदर्शित झाला, जे तिन्ही चित्रपट ज्युलिया रॉबर्ट्स अभिनीत स्लीपिंग विथ द एनीमी (१९९१) या चित्रपटावर आधारित होते. काही वर्षांनी, हा चित्रपट उडिया भाषेत मु सपनारा सौदागर या नावाने पुन्हा बनवण्यात आला. १९९६ मध्ये त्याच कथानकावर आधारित भोय हा बंगाली चित्रपटही बनवण्यात आला. इंडियन एक्सप्रेसने १९९६ च्या पाच "सुपर-हिट" चित्रपटांमध्ये अग्नि साक्षीला पहिले स्थान दिले. या चित्रपटाने जगभरात 31 कोटींची कमाई केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →