अखिलेश यादव (जन्म : सैफई-इटावा जिल्हा, १ जुलै १९७३) हा भारतातील एक राजकारणी, समाजवादी पक्षाचा पक्षप्रमुख व उत्तर प्रदेश राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१७ दरम्यान ह्या पदावर असणारा अखिलेश हा उत्तर प्रदेशचा आजवरचा सर्वात तरुण मुख्यमंत्री आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव ह्यांचा मुलगा असलेला अखिलेश २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर आला. ५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर २०१७ विधानसभा निवडणुकीत अखिलेश व समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अखिलेश यादव
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.