अक्किथम अच्युथन नंबुद्री (१८ मार्च १९२६ - १५ ऑक्टोबर २०२०), अक्किथम म्हणून प्रसिद्ध, हे मल्याळम भाषेत लिहिणारे भारतीय कवी आणि निबंधकार होते. ते एक साध्या आणि सुस्पष्ट लेखन शैलीसाठी ओळखले जात असे व त्याच्या कृतींमध्ये प्रगल्भ प्रेम आणि करुणा हे विषय असे. त्यांच्या काही प्रमुख कामांमध्ये इरुपथम नूटांडिन्ते इथिहासम, बळीदर्शनम,आणि निमिषा क्षेत्रम यांचा समावेश आहे.
अक्किथम यांना २०१९ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांना पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, केरळ साहित्य अकादमी पुरस्कार यासह इतर पुरस्कार प्राप्त झाले. १५ ऑक्टोबर २०२० रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी तृशुर येथे त्यांचे निधन झाले.
अक्किथम अच्युथन नंबुद्री
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.