अकोले

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अकोले

अकोले- Wrtten By- Er. Akshay Sahebrao Shenkar

अकोले, जि. अहिल्यानगर, ४२२६०१. अकोले हे शहर प्रवरा ( अमृतवाहिनी ) या नदीकाठी वसलेले असून, अकोले हे तालुक्याचे ठिकाण असून मोठी बाजारपेठ आहे, अकोले शहरात गुरुवारी आठवडा बाजार भरतो.अकोले हा विधानसभा मतदार संघ असून तो स्थापनेपासून अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

अकोले शहरात व तालुक्यात पुढील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत-

१) अकोले शहरातील अगस्त्य ऋषींचा आश्रम- याच ठिकाणी प्रभू श्रीराम, माता सीता व लक्ष्मण यांनी वनवासाला जाताना नासिक (पंचवटी) येथून येऊन येऊन अगस्त्य ऋषींचा आशीर्वाद घेतला होता,या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते व हजारो भाविक येथे दर्शन घेतात.

२) अकोले तालुक्यातील म्हाळादेवी कुलदैवत खंडोबा मंदिर- या ठिकाणी कुलदैवत खंडोबा मंदिर असून या ठिकाणी हनुमान जयंतीच्या दिवशी मोठी यात्रा भरते

३) अकोले शहरात प्रवरा नदी काठी प्राचीन काळातील सिद्धेश्वर मंदिर जमिनीचे खोदकाम करताना सापडलेले असून ते दगडात कोरलेले आहे, याची मालकी खासगी आहे मात्र दर्शनासाठी सर्वांना खुले आहे.

४) अकोले तालुक्यात टाहाकारी येथे जगदंबा मंदिर- टाहाकारी या गावात प्रसिद्ध जगदंबा मातेचे प्राचीन मंदिर.

५ ) अकोले तालुक्यातील पिंपळदरी या गावात येडू मातेचे मंदिर-अकोले तालुक्यातील पिंपळदरी या गावात येडू मातेचे मंदिर असून, येडू माता भिल्ल समाजाची दैवत मानाली जाते, हनुमान जयंतीच्या दिवशी मोठी यात्रा भरते, व अनेक बोकड्यांचा बळी या ठिकाणी दिला जातो.

६)अकोले तालुक्यात पिंपळगाव या ठिकाणी संटू मातेचं मंदिर असून, त्या ठिकाणी लहान बाळांचे जावळ मामाच्या हातून काढून अर्पण केले जातात.

७) अकोले तालुक्यात राजूर या ठिकाणी वर्षातून एकदा मोठा उरूस भरतो, तेथे मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री केली जाते.

अकोले तालुक्यात पुढील पर्यटन स्थळे आहेत-

भंडारदरा धरण- या ठिकाणी १० मेगावॉट्स व ३४ मेगावॉट्स असे दोन जलविद्युत प्रकल्प आहेत.

रंधा फॉल- अनेक चित्रपटांची शूटिंग या ठिकाणी केली आहे, उदा. अजय देवगण यांचा जाण चित्रपट.

साम्रद दरी (वॅली)- भारतातील सर्वात मोठी व आशियातील दोन नंबरची दरी.

अमृतेश्वर टेम्पल- प्रवरा नदीचे उगम स्थान.

कळसुबाई शिखर- महारष्ट्रातील सर्वात उंच शिखर, उंची- १६४६ मीटर

हरिश्चंद्रगड -या ठिकाणी कधीही खोटे न बोलणाऱ्या राजा हरिश्चंद्रचे मंदिर असून, या ठिकाणच्या तळ्यात कोणीही स्नानासाठी गेल्यास त्याच्या कंबरेपर्यंतच पाणी लागते.

फोफसंडी- अकोले तालुक्यात फोफसंडी हे गाव सर्व बाजूनी डोंगरांनी वेढलेले असून या ठिकाणी दुपारी १२ वाजता सूर्य उगवतो. इंग्रज अधिकारी फोफ्स हा रविवारी (संडे) ला या ठिकाणी विश्राम करण्यासाठी जात असे त्यावरून या गावाचे नाव फोफसंडी पडले, या ठिकाणी फोफ्स अधिकाऱ्याचे तत्कालीन वाडा आहे

अकोले तालुक्यात पुढील शैक्षणिक संस्था आहेत-

१) अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटी सार्वजनिक संस्था असून त्यांचेमार्फत अकोले शहरात उच्च माध्यमिक कॉलेज (११ वी व १२ वी - सायन्स, कॉमर्स व आर्ट्स ) व तसेच बी. एस्सी, एम. एस्सी, बी. कॉम, एम. कॉम, बी. ए, एम ए , बी. बी. ए, एम. बी. ए, बी. सी. एस, बी. सी. ए, एम. सी. ए हे विविध पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण सावित्रीबाई फुलर पुणे विद्यापिठा अंतर्गत दिले जाते. तसेच अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी तंत्रनिकेतन कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे कॉलेज, व परफेक्ट ही इंग्लिश मिडीयम स्कूल आहे.

२) अभिनव शिक्षण संस्था- ही संस्था देखील अकोले शहरात असून तेथे उच्च माध्यमिक कॉलेज (११ वी व १२ वी - सायन्स) बी. एस्सी,एम. बी. ए हे विविध कोर्स आहेत.

३) आनंदगड विरगाव- डि. फार्म, बी. फार्म, अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कूल आहे.

४ ) अगस्ती एज्यूकेशन सोसायटी- अगस्ती एडुकेशन सोसायटी या संस्थेचे अकोले शहरात माध्यमिक विद्यालय असून त्यांचे विद्यालये तालुक्यातील कळस, देवठाण, ब्राम्हणवाडा, सुगाव, पिसेवाडी अश्या ठिकाणी माध्यमिक विद्यालये आहेत.

तसेच इतर रयत शिक्षण संस्था, हिंद सेवा मंडळ व मराठा विद्या प्रसारक समाजाचे माध्यमिक विद्यालये आहेत.

अकोले तालुक्यातील सहकारी उद्योग-

१)अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असलेली अगस्ती सहकारी साखर कारखाना, लिमिटेड, अगस्तीनगर ही सभासद मालकीची सहकारी संस्था असून येथे दररोज ३५०० मे. टन उसाचे गाळप केले जाते व ३० हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जाते.

२)अकोले तालुक्याच्या सभासदांच्या मालकीचा अमृतसागर दूध उत्पादन संघ असून वाशेरे येथे प्लांट आहे, दुधापासून विविध उत्पादने तेथे निर्माण केले जातात.

अकोले तालुक्यातील धरणे-

१) भंडारदरा धरण ११ टी. एम. सी.क्षमता, २) निळवंडे धरण ७.८ टी. एम. सी. क्षमता, ३) पिंपळगाव खांड धरण, ४) आढळा प्रकल्प, ५) पैठण प्रकल्प, ६) आंबित प्रकल्प व इतर अनेक लहान प्रकल्प आहेत.

अकोले तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व-

१) आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे - महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्‍यांचा जन्‍म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोले) येथे झाला.

२) ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर- अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे मूळ गाव, महारष्ट्रातील प्रसिद्ध समाज प्रभोधनकार.

३) राजश्री लांडगे- गाढवाचे लग्न या चित्रपटात गंगीची भूमिका करणारी अभिनेत्री अकोले तालुक्यातील कळंब या गावाची आहे.

Wrtten By- Er. Akshay Sahebrao Shenkar

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →