अंटार्क्टिका

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अंटार्क्टिका

अंटार्क्टिका (रोमन लिपी: Antarctica ;) हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागर म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →