अंजनीबाई मालपेकर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अंजनीबाई मालपेकर

अंजनीबाई मालपेकर (जन्म : २२ एप्रिल १८८३; - ७ऑगस्ट १९७४) ह्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या भेंडीबाजार घराण्यातील सुप्रसिद्ध गायिका होत्या. १९५८मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिपने सन्मानित होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

तारुण्यात त्यांच्या सौंदर्याचे कौतुक चित्रकार राजा रविवर्मा आणि माधव विश्वनाथ धुरंधर यांनी त्यांच्यावर अनेक चित्रे बनवून केले.

भेंडीबाजार घराण्याची ख्याती त्यांच्या गायनामुळे वाढली. त्यांनी कुमार गंधर्व आणि किशोरी आमोणकर यांसारख्या अनेक गायकांना संगीत शिकविले..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →