ॲल पचिनो

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ॲल पचिनो

अल्फ्रेडो जेम्स ॲल पचिनो (एप्रिल २५, इ.स. १९४०) हा अकॅडेमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि टोनी पुरस्कार विजेता अमेरिकन रंगभूमी व चित्रपट अभिनेता आहे.

पचिनोचा जन्म न्यू यॉर्क शहरातील मॅनहटन विभागात एका इटालियन-अमेरिकन दांपत्याच्या पोटी झाला. त्याचे आईचे नाव रोज गेरार्ड आणि वडिलांचे नाव सॅल्व्हॅडोर पचिनो होते. पचिनो २ वर्षांचा असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अल आणि आई त्याच्या आजी-आजोबांबरोबर राहण्यासाठी न्यू यॉर्कमधील द ब्रॉन्क्स इथे गेले. त्याचे वडील सॅल्व्हॅडोर हे कॅलिफोर्नियातील कोविना येथे विमा विक्रेते आणि पचिनोज लाउंज (Pacino's Lounge) नावाच्या रेस्टॉरंटचे मालक म्हणून राहण्यास गेले.

इ.स.१९९० मध्ये पचिनोज लाउंज हे अडचणींमुळे बंद पडले. आता ते सायट्रस ग्रिल या नावाने ओळखले जाते. वयाच्या ८२ व्या वर्षी सॅल्व्हॅडोर यांचा १ जानेवारी २००५ मध्ये म्रृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →