ॲडमिन बॉक्सची लढाई, न्गाक्येडौकची लढाई किंवा सिंझवेयाची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि जपानी सैन्यामध्ये झालेली लढाई होती. ५-२३ फेब्रुवारी, १९४४ दरम्यान आराकानजवळ झालेल्या या लढाईत दोस्तांचा विजय झाला.
ही लढाई सध्याच्या बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेजवळ झाली होती. यात जपान्यांची एक डिव्हिजन तर दोस्त राष्ट्रांच्या दोन डिव्हिजन आणि एक रेजिमेंट होत्या. याशिवाय दोस्तांनी अधिक दोन डिव्हिजनांची कुमक पाठवली. यात दोस्त राष्ट्रांचे ३,५०६ सैनिक मृत्यू पावले आणि जपान्यांकडून लढणारे ३,१०६ मृत्यू पावले तसेच २,२२९ सैनिक जखमी झाले. याशिवाय दोस्तांची तीन आणि जपान्यांची ६५ लढाऊ विमाने कामी आली.
या लढाईमध्ये दोन्हीकडून भारतीय सैनिक लढले. दोस्त राष्ट्रांकडून ते ब्रिटिश भारतीय लष्कराचा भाग होते तर जपान्यांकडून आझाद हिंद फौजेच्या ध्वजाखाली ते लढले.
ॲडमिन बॉक्सची लढाई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!