२०२५ सौदी अरेबियन ग्रांप्री ही १८ ते २० एप्रिल २०२५ दरम्यान जेद्दा कॉर्निश सर्किटवर पार पडलेली २०२५ फॉर्म्युला वन हंगामातील पाचवी शर्यत होती. रात्री झालेल्या ५० फेऱ्यांच्या या शर्यतीत ऑस्कर पियास्त्रीने मॅकलारेनसाठी विजय मिळवला; मॅक्स व्हर्सटॅपन दुसरा व शार्ल लक्लेर तिसरा आला. हा पियास्त्रीचा त्या हंगामातील तिसरा विजय होता आणि त्याने चालक अजिंक्यपदात पहिली आघाडी मिळवली.
रेड बुल रेसिंगच्या व्हर्सटॅपनने १:२७.२९४ या वेळेसह पोल पोझिशन मिळवली, तर चौथ्या क्रमांकावर शर्यत संपवणाऱ्या लॅन्डो नॉरिसने ४१व्या फेरीत १:३१.७७८ ही शर्यतीतील सर्वात जलद फेरी पूर्ण केली.
२०२५ सौदी अरेबियन ग्रांप्री
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?