२०२५ पश्चिम आफ्रिका चषक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०२५ पश्चिम आफ्रिका चषक ही ४ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान नायजेरियामध्ये आयोजित करण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. पश्चिम आफ्रिका चषकाची ही दुसरी आवृत्ती होती. स्पर्धेतील सामने अबुजा येथील नायजेरिया क्रिकेट फेडरेशन ओव्हल १ येथे खेळवण्यात आले.

यजमान नायजेरियासह ऱ्वांडा, सियेरा लिओन आणि झांबिया या चार संघांनी स्पर्धेत भाग घेतला. चारही संघांनी तिहेरी साखळी फेरी खेळली, त्यानंतर तिसऱ्या स्थानाचा सामना आणि अंतिम सामना खेळवण्यात आला.

नायजेरियाने अंतिम सामन्यात ऱ्वांडाचा ४० धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नायजेरियाचे हे पश्चिम आफ्रिका चषकातील सलग दुसरे विजेतेपद होते. झांबियाने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात सियेरा लिओनचा २० धावांनी पराभव करून तिसरे स्थान मिळवले.

झांबियाचा झोयेब चंद स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला. नायजेरियाच्या इसाक डॅनलाडीने सर्वाधिक ३२४ धावा केल्या, तर ऱ्वांडाचे मुहम्मद नादिर व एमिल रुकिरिझा आणि नायजेरियाचा इसाक ओक्पे यांनी प्रत्येकी १५ बळी घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →